प्रबोधनपर भारुडातून मतदार जनजागृती

0
प्रबोधनपर भारुडातून मतदार जनजागृती

प्रबोधनपर भारुडातून मतदार जनजागृती

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत हिप्परगा (काजळ) येथील सर्व ग्रामस्थ,सुजाण जागरूक मतदारांना स्वीप पथकाचे रचनाकार नागनाथ स्वामी यांनी रचना केलेली भारुड हा गीतप्रकारातून मोहन तेलंगे यांनी रंजक पद्धतीने जनजागृती केली.गावातील प्रत्येक मतदार बांधवांनी ७ मे रोजी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदान करावे असे पथकद्वारे आवाहन केले.
लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडांची रचना केली.भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसून त्यातून प्रबोधन होणेही अपेक्षित असते. भारुडांतून समाज प्रबोधन तसेच मनोरंजन करावे लागते.अभिनय व प्रबोधन या दोन्ही गोष्टींची सांगड घालून भारुडांने मतदार राजाचे मनोरंजनातून आपला हेतू साध्य करणे हे एक कौशल्य आहे.
समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्त्वज्ञान मतदारांना कळावेत असे शब्दरचना स्वीप पथकाच्या भारुडांत आढळून येते.भारूड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार असल्याने बऱ्याच संप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतला आहे.
संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्यरचनेला शिखरावर नेऊन पोहोचविले होते.
भारूडातील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे असल्याने त्याचा अर्थ सहज समजतो.या माध्यमाचा वापर करुन स्वीप पथक जनजागृती करीत आहे.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य राज्यपुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने आदिनी परिश्रम घेतले. गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक नागनाथ स्वामी तर आभार महादेव खळुरे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *