देशातील महिला शक्ती निर्णायक : चित्राताई वाघ
अहमदपूर (गोविंद काळे) : देशात महिलांची संख्या 50 टक्के आहे. याचाच अर्थ सर्वच क्षेत्रात महिलांचा वाटा अर्धा आहे. 2014 पूर्वीच्या राज्यकत्यांनी या शक्तीकडे सपशेल दूर्लक्ष केले. पण नरेंद्र मोदी यांनी महिला शक्तीला वंदन करत आरक्षणासह विविध सुख सोयी मिळवून दिल्या. ही महिला शक्ती निर्णायक असून भाजपच्या विजयात महिलांचा वाटा निर्णायक ठरणार आहे, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.
भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर शहरातील सानवी मंगल कार्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ बोलत होत्या. मंचावर महायुतीचे उमेदवार खा.सुधाकर श्रृंगारे, डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस रेखाताई तरडे, सौ. सुप्रिया पायाळ, अॅड.जयश्री पाटील, माजी सभापती सौ. अयोध्याताई केंद्रे, माजी नगराध्यक्षा सौ. अश्विनीताई कासनाळे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जयश्री केंद्रे, चाकूर तालुकाध्यक्ष मनीषा नवणे, जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई तेलंग,जिल्हा सरचिटणीस प्रणिता बेंबळगे, राष्ट्रवादी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. मिनाक्षी शिंगडे, तालुका प्रमुख शाहूताई कांबळे, धनश्री आज मीनाताई भोसले,संध्या राजपूत, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. कल्पना महाजन, सौ. अवंतीताई कुलकर्णी, सत्यभामा चिंते, सौ. आशाताई रोडगे, सौ.दैवशाला शिंदे, श्रीमती. मिनाक्षी तौर, लक्ष्मी पांचाळ यांची उपस्थिती होती.- उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना चित्राताई म्हणाल्या – की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांची सर्वकष काळजी घेत आहेत. महिलांसाठी त्यांनी विविध योजना सुरू केल्या आहेत. अगदी महिला गर्भवती राहिल्यापासून तिच्या पोषण आहाराची काळजी घेणारी योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. मुलींसाठी सुकन्या योजना राबवून महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. पंतप्रधान आवास घरकुल योजना ही सुद्धा महिलांच्याच नावाने सुरू केली असून 11 कोटी स्वच्छतागृह बांधून देत महिलांची होणारी बेअब्रू थांबविण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. हर घर नल योजनेच्या माध्यमातून महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवून प्रत्येक गावात, प्रत्येक घरी पाणीपुरवठा केला जात आहे. कोरोनाच्या काळात मोफत लस देऊन जनतेला जीवनदान देण्याचे काम मोदी सरकारनेच केले आहे. 80 कोटी भारतीयांना मोफत अन्नधान्य पुरवठा करुन जनतेला मोठा दिलासा देण्याचे कार्य याच सरकारने केले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्य झाले असून देशातील महिलांना याची जाणिव आहे. त्यामुळेच या निवडणुकीत भारतातील महिला शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या पाठीशी उभी असल्याचे चित्राताई म्हणाल्या..मेळाव्याचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टी महीला मोर्चा च्या प्रदेश सरचिटणीस रेखाताई तरडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता आबंदे तर आभार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी मानले.
सदरील महीला मेळावा यशस्वी करण्यासाठी धैर्यशील देशमुख, डॉ. सिद्धार्थ सुर्यवंशी, निखिल कासनाळे, अमित रेड्डी, श्रीकांत देशमुख, द्वारकादास नाईक यांच्या सह भारतीय जनता पक्षाच्या महीला मोर्चा च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घेतले.