महायुतीचे उमेदवार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या विजयासाठी भाजपा पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पाऊल पुढे – आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : देशाच्या हितासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी राहणे ही काळाची नितांत गरज असल्याने महायुतीचे उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांच्या विजयासाठी भारतीय जनता पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक पाऊल पुढे टाकून प्रचारात अग्रेसर राहणार असल्याचे प्रतिपादन महायुतीच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
अहमदपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात महायुतीच्या निवडक कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली त्यावेळी आमदार बाबासाहेब पाटील बोलत होते.
सदरील बैठकीत महायुतीच्या नेते मंडळीनी प्रचार यंत्रणेचे तंतोतंत नियोजन करून एक दिलाने, एकत्रित प्रचार यंत्रणा राबवून महायुतीचे उमेदवार खा सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जिवापाड प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरले.
सदरील बैठकीत आ. बाबासाहेब पाटील यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील,माजी आमदार बब्रुवान खंदाडे,माजी नगराध्यक्ष भारत भाऊ चामे,माजी सभापती अशोक काका केंद्रे यांनी महायुतीच्या उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सदरील बैठकीस आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अॅड. भारत चामे, माजी सभापती अशोक काका केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हिंगणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, माजी सभापती अॅड. टी. एन. कांबळे,ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानोबा बडगिरे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, भाजपाचे शहराध्यक्ष सुशांत गुणाले,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, चंदशेखर डांगे,जिल्हा चिटणीस हणमंत देवकते,माजी सभापती शिवाजी खांडेकर,प्रशांत भोसले, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे, अल्पसंख्याक मोर्चाचे बबलू पठाण, बाबूभाई रुईकर, मन्नार शेख, अभय मिरकले,प्रकाश फुलारी,अमित रेड्डी,जावेद बागवान , परमेश्वर आढाव, चंदशेखर भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला जिल्हा अध्यक्षा सौ. मिनाक्षी शिंगडे, भाजप महीला मोर्चा च्या जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई तेलंग, भाजप महीला मोर्चा च्या तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे, राष्ट्रवादी महीला मोर्चा च्या तालुका अध्यक्षा सौ. शाहूताई कांबळे यांच्या सह भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई, रासप, मनसे चे प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.