संत ज्ञानेश्वर विद्यालयाची संस्कृती मलशेट्टे व तन्वी पस्तापुरे बॉल बॅडमिंटन स्पर्धेत राज्यात दुसरा

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयाची संस्कृती मलशेट्टे व तन्वी पस्तापुरे बॉल बॅडमिंटन स्पर्धेत राज्यात दुसरा

अहमदपूर (गोविंद काळे) : गडचिरोली येथे संपन्न झालेल्या 42 व्या महाराष्ट्र स्टेट सब ज्युनिअर बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 37 संघाने सहभाग नोंदवला होता त्यात संत ज्ञानेश्वर विद्यालयाची कुमारी संस्कृती श्रीशैल्य मलशेट्टे व तन्वी मनोजकुमार पस्तापुरे यांचा संघ महाराष्ट्र राज्यात सर्व द्वितीय राहिलेला आहे. या अंतिम स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यामध्ये पुणे जिल्हा प्रथम आणि लातूर जिल्हा सर्व द्वितीय राहिलेला आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक अर्शद शेख आणि मनीषा सूर्यवंशी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई हाके पाटील संस्थेच्या उपाध्यक्षा एडवोकेट मानसी हाके पाटील, असद स्पोर्ट अकॅडमीचे प्रमुख पी.एस.आय. असद शेख , मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed