मोटार सायकलच्या डिक्कीतुन १ लाख ५० हजार रुपयासह मोबाईल चोरी ; अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीसात गुन्हा दाखल

0
मोटार सायकलच्या डिक्कीतुन १ लाख ५० हजार रुपयासह मोबाईल चोरी ; अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीसात गुन्हा दाखल

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील सावरकर चौक येथील सुरेश ढेले यांच्या पम्मचरच्या दुकानी पम्मचर काढण्यासाठी मोटार साईकल लावली असता मोटार साईकलच्या डिक्कीतुन अज्ञात चोरट्याने १ लाख ५० हजार रूपया सह मोबाईल चोरी केल्याची घटना दि २२ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ : ०० वाजता घडली असुन अज्ञात आरोपी विरूध्द अहमदपूर पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहेयाविषयी सविस्तर माहीती अशी की शहरातील नांदेड रोडवरील एल आय सी ऑफीस समोर राहणारे किराणा दुकानाचे व्यापारी गंगाधर इंद्राळे हे नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळी पोलीस स्टेशन समोर असलेले आपले किराणा मालाचे दुकान सोमवारचा बाजार दिवस असल्यामुळे अजय किराणा या दुकानात बसुन दिवसभर गिऱ्हाईक करून दि २२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ : ५० वाजता दुकान बंद करून दिवसभर गिऱ्हाईक करून जमा झालेले ५० हजार रुपये व व्यापाऱ्यांना देण्यासाठी घरून घेऊन आलेले १ लाख रूपये असे एकुन १ लाख ५० हजार रूपये तसेच एक रेडमी कंपनीचा १८ हजार रूपयेचा मोबाईल हिरो होन्डा फॅशन प्रो कंपनीच्या एम.एच २४ ए.ई २९११ या क्रमांकाच्या मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवला परंतु मोटार सायकल पम्मचर झाली असल्याचे लक्षात येता पत्नीला पाई चालत येण्यासाठी सांगुन ते पम्मचर काढण्यासाठी सावरकर चौक येथील सुरेश ढेले यांच्या पम्मचरच्या दुकानी गेले व त्यांनी पम्मचर काढण्यास सांगुन आपल्या पाठी मागुन पाई चालत येत असलेल्या पत्नीला पाहण्यासाठी गेले परंतु त्यांनी मोटार सायकलची स्विचची चावी काढण्यास विसरून गेले परत पत्नीसोबत येऊन पम्मचर काढलेल्या गाडीवर बसले असता त्यांच्या लक्षात आले की गाडीची डिक्की उघडी आहे डिक्की तपासुन पाहीली असता विक्रम कंपनीच्या चहाच्या बॅगेत ठेवलेले १ लाख ५० हजार रूपये रोख १८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल तीन आधार कार्ड, तीन मतदान कार्ड , तीन पॅन कार्ड एक चेकबुक कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे समजले असता पोलीस स्टेशन अहमदपूर येथे जाऊन फिर्याद दिली असता दिलेल्या फिर्यादी वरून अहमदपूर पोलीसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस अधिक्षक नवदीप अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरिक्षक रवि बुरकुले हे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *