जातीय समिकरणापेक्षा, देश हिताचे समिकरण महत्त्वाचे

0
जातीय समिकरणापेक्षा, देश हिताचे समिकरण महत्त्वाचे

भाजपा तालुका अध्यक्ष प्रताप पाटील


अहमदपूर (गोविंद काळे) : स्वताच्या राजकीय अस्तित्वासाठी आज जाती जाती मध्ये तेड निर्माण करण्याचे काम काँग्रेस व महा विकास आघाडी करत आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ हा एससी राखीव असून सुद्धा काँग्रेस पक्षाने खऱ्या एससी समाजाचा उमेदवार न देता हिंदू मधील उमेदवार देवून ओरीजनल एससी समाजावर घोर अन्याय केला आहे. आज देशाची प्रगती करायची असेल तर जातीय समिकरणापेक्षा देश हिताचे समिकरण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अहमदपूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील यांनी केले आहे.
लातूर जिल्ह्यातील बहुतांश लिंगायत समाज हा भाजपाच्या विचार धारणेचा असल्याने मताचे विभाजन व्हावे म्हणून काँग्रेस पक्षाने जाणीव पुर्वक उमेदवारी दिली आहे. काँग्रेस पक्षाने टाकलेला उमेदवारी चा डाव लातूर जिल्ह्यातील लिंगायत समाज हाणून पाडल्या शिवाय राहणार नाहीत मागील काळात याच काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांनी शिवराज पाटील चाकुरकर व बसवराज पाटील मुरुमकर यांना बॅक फुटवर आणण्याचे पाप केले आसल्याचे ही यावेळी
तालुका अध्यक्ष प्रताप पाटील म्हणाले.
देशाची सुरक्षा व देशाचा सर्वागीण विकासासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी नरेंद्रजी मोदी व दुसऱ्यांदा खा. सुधाकरराव श्रृगांरे राहणे देश हिताचे व जिल्ह्याच्या हिताचे आहे.
निष्कलंक व निष्पाप असलेल्या खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मत म्हणजे नरेंद्रजी मोदी यांना मत असल्याने महायुतीचे लोकप्रिय उमेदवार खा सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी माझा लिंगायत समाज व माझ्या भारतीय जनता पक्षाची संपूर्ण ताकद लावून खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचेही यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed