महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकाचा राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने सत्कार व स्वागत

0
महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकाचा राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने सत्कार व स्वागत

लातूर (एल. पी. उगिले)
लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत भरू लागली असून अनेक स्टार प्रचारक महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्ह्यात येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे तसेच काँग्रेस पक्षाचे नेते खा. चंद्रकांत हांडोरे हे लातूर येथे आले असता, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष, पॅंथर नेते निवृत्तीराव सांगवे यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि नेते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे पदाधिकारी व नेते, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी स्वागत व सत्काराच्या नंतर राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने निवृत्तीराव सांगवे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये दलित अधिकार मंच आणि पॅंथरचे कार्यकर्ते यांच्या उत्कृष्ट कार्याचा अहवाल दिला. तसेच या निवडणुकीमध्ये मोठ्या जिद्दीने काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वजण प्रयत्न करत असल्याचेही सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed