किलबील शाळेतील विद्यार्थ्यांने दिला मतदान जनजागृतीचा संदेश
अहमदपूर (गोविंद काळे) : किलबील नँशनल स्कूल जवळगा येथिल विद्यार्थ्यांने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी येणाऱ्या ७ मे रोजी “मिशन डिस्टिंक्शन” साठी मतदान होण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृती केली.यावेळी विद्यार्थ्यांने आपल्या कुटुंबातील सर्व पालक बंधूचे मतदान करुन घेण्याची शपथ घेऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला.
आम्ही भावी मतदार आजी मतदारांना ..मतदानासाठी वेळ काढा,आपली जबाबदारी पार पाळा..!मतदार राजा जागा,हो,लोकशाहीचा धागा हो.....! वाढवू तिरंग्याची शान,करुया देशासाठी मतदान..!
न नशे से,न नोट से,किस्मत बदलेगी वोट से…!छोडकर सारे काम,चलो करे मतदान…! अशा विविध घोषवाक्यातून
मतदार बांधवासाठी हातात घोषवाक्याचे फलक घेऊन संदेश दिला.
यावेळी तहसील कार्यालय अहमदपूर येथिल स्वीप कला पथकाने विविध प्रबोधनपर मतदार जनजागृतीपर लोकगीतातून विद्यार्थ्यांना कुटुंबातील सर्व मतदान बंधु भगिणीचे मतदान करुन घेण्यासाठी आवान केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,बस्वेश्वर थोटे,श्रीमती अर्चना माने, यांनी परिश्रम घेतले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे प्राचार्य संतोष पाटील तर आभार किलबील नँशनल स्कूलचे संचालक ज्ञानोबा भोसले तर सूत्रसंचालन सचिन जगताप यांनी केले.