शिरुर ताजबंद येथिल मतदारांनी लोकसभेसाठी मतदानाचा विक्रम रचावा
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी शिरुर ताजबंद गावातून ७ मे रोजी १००% मतदान करण्यासाठी विविध प्रबोधनात्मक लोकगीतातून २५ एप्रिल रोजी सायंकाळी उपस्थितीत मतदार बंधूना जनजागृती केली.यावेळी मतदानांचा उच्चांक रचून एक आदर्श निर्माण करावे स्वीप पथकाने जनजागृती केली.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड व चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव,शिक्षणाधिकारी नागेश मापारी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे ,जयसिंह जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी,बस्वेश्वर थोटे,पुरुषोत्तम काळे,श्रीमती अर्चना माने,याच्यांसह शिरुर ताजबंद येथिल प्रतिष्ठित नागरिक सुरज पाटील,उत्तम भदाडे,नवनित जामणीक,आभिषेक बिलापट्टे,बाबुराव श्रीमंगले,वैभव कांबळे,गावातील मतदार बंधू भगिणिनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थितीत होते.