जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासर्णीचे घवघवीत यशजिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासर्णीचे घवघवीत यशजिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासर्णीचे घवघवीत यश
अहमदपूर ( गोविंद काळे ) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासर्णी ता. अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्य श्रेया आय. ए. एस. परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन करून अल्पावधीतच शाळेचे नाव लौकिक केल्याबद्दल गुणवंत विद्याथ्यीचे सर्व भागातून अभिनंदन होत आहे. या परीक्षेत शाळेतील चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले असुन त्यात माहेश्वरी महेंद्र तिडोळे ही राज्यात सातवी, रोहन गणेश महाले राज्यात आठवा, सोहम माधव गोंड राज्यात सातवा तर आरोही गंगाधर गीरी राज्यात सव्वीस वा क्रमांक मीळवून राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे तसेच विराज बालाजी गोंड, सुरज पांडुरंग कोपणर, औदूंबर विठ्ठल जाधव, महेश्वरी देवानंद तिडोळे, कार्तीक गंगाधर गीरी, धनसी कोपणार या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे
या शाळेत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धापरीक्षेस विद्यार्थ्यांना बसवून यश संपादन केल्याबद्दल गावचे सरपंच शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष ज्ञानबा तियुके, तंटामुक्ती अध्यक्ष राऊतराव, यांनी विद्यार्थी व शिक्षकाचे अभिनंदन केले पाठक मालव गोंड यांनी विषयाना मार्गदर्शन केले. शिक्षणप्रेमी नागरीक चंद्रकांत गोंड यांनी बैलगाडीतून विद्याथ्यीची मिरवळूक काढली. यशस्वी विद्यार्थ्यांना मुअ पाटील सर, शेख सर, अंकुश पोतवळे सर, महेबुब मिर्झा सरांचे मार्गदर्शन लाभले.