जयंती दिन हा संकल्प दिन म्हणून साजरा करावा – डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करत असताना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्यातले दुर्गुण कमी करण्याचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेल्यास खऱ्या अर्थाने जयंती साजरी केल्याचे समाधान होईल असे प्रतिपादन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाहिप्परगा ग्रामपंचायतीच्या सरपंच बबीता कोमले होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी केंद्रे,सचिन बानाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुरूवातीला युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर त्रीशरण,पंचशिल,बूध्द पूजा पाठ घेण्यात आले.
या वेळेस गावातील छोट्या छोट्या बालकांनी जयंती संबंधाने भारदस्त मनोगते व भाषणे केली.
पुढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,आज युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत असुन ही चिंतेची बाब आहे.व्यसनमुक्त समाज घडविने ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यासाठी आता युवकांनीच संकल्प करावा असे अवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष राहुल जोंधळे, उपाध्यक्ष आकाश ढवळे,संजय भालेराव, सुनिल भालेराव, नवनाथ भालेराव, सुखदेव भालेराव, सुरेश भालेराव,अजय भालेराव,केशव कांबळे, सुखदेव कांबळे,माधव कांबळे, मिलींद कांबळे,रवि कांबळे, आदित्य भालेराव, प्रविण गायकवाड, सिध्दार्थ कांबळे, विश्वनाथ भालेराव, आदित्य कांबळे, रावसाहेब गवळे,बालाजी गवळे यांनी केले सूत्रसंचालन व्यंकटराव कदम यांनी तर आभार प्रदर्शन संजय भालेराव यांनी मानले