जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकुर यांच्या हस्ते मतदान जनजागृती स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ
अहमदपूर (गोविंद काळे) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघात मिशन डिस्टिंक्शन पेक्षा जास्त मतदान व्हावे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. ‘चुनाव का पर्व, देश का गौरव’ या टॅग लाईनखाली मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार, ‘आपणही आपल्या मतदानासाठी ७ मे रोजी सज्ज रहा’ असे सांगत अहमदपूर तहसील कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या फलकावर दि.२६ रोजी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर,सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी स्वाक्षरी करुन मतदारांना स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांनी स्वीपच्या कार्याबद्दल माहिती घेतली.पर्यटन क्षेत्रातील मतदारांना तसेच महिला मतदांराना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन मतदानाची टक्केवारी वाढवावे असे मत मांडले.स्वीप पथक प्रमुख महादेव खळुरे यांनी ४२ दिवसात ६४ गावातून जनजागृती करण्यात आले असून विविध उपक्रम जनजागृती करण्यात येत आहे आशी माहिती दिली.स्वाक्षरी मोहिमेसाठी विविध क्षेत्रातील मतदार आम्बेसेटर म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय अहमदपूरचे संचालिका बीके छाया बहन,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरहरी सुरनर,प्रवचनकार नागनाथ स्वामी,योगशिक्षक गौरव चवंडा,स्काऊट मास्टर सुनील स्वामी,ईस्माईल शेख,यांनी स्वाक्षरी करुन जनजागृती केली.
उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.भारत कदम,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे,तहसीलदार शिवीजी पालेपाड,चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांनीही स्वाक्षरी मोहिमेस उपस्थित राहुन सहभाग नोंदविला.याप्रसंगी सर्व मान्यवरानी स्वाक्षरी करुन सदर मोहिमेतून मतदानाबाबत प्रबोधनात्मक संदेशात्मक फलक हातात घेऊन सुजान मतदार बांधवाना लोकशाही बळकट करण्यासाठी..मी मतदान करणार.!,संविधानाने दिलेला अधिकार बजावण्यासाठी.. मी मतदान करणार..!,लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी. मी मतदान करणार..!,राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी. मी मतदान करणार..!मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी. मी मतदान करणार..!असा संदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.स्वीप पथक सदस्य शिवकुमार गुळवे,पुरुषोत्तम काळे,तहसीलचे कर्मचारी बांधव यशस्वीपणे स्वाक्षरी मोहिम राबवून मतदान जनजागृती केली.