लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा कलाध्यापक महादेव खळुरे
अहमदपूर (गोविंद काळे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अहमदपूर चाकूर विधासभा मतदार संघात स्वीप पथकाद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रमातून जनजागृती होत असून दि.१९ रोजी सकाळी मौजे येस्तार येथिल मतदार बंधू-भगिणींना मतदानाचे महत्त्व पटवून देवून,लोकशाहीतील महा उत्सवात सहभाग नोंदवावेत. आपण शासनाच्या सर्व सोई सुविधा हक्काने उपभोगत आहोत.संविधानाने आपणास दिलेला मतदानाचा हक्क येणाऱ्या ७ मे रोजी आपले कर्तव्य समजून पार पाडून देशाचे आदर्श भारतीय नागरीक होण्याचे कर्तव्य पार पाडून देशातील आदर्श नागरीक होण्यासाठी महाउत्सवात सहभाग नोंदवावेत.असे स्वीप कलापथक प्रमुख महादेव खळुरे यांनी शासनाच्या वतीने आवाहन केले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार शिवाजी पालेपाड,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे पथक प्रमुख राज्यपुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,श्रीमती अर्चना माने,आदिनी परिश्रम घेतले.येस्तार येथिल तलाठी शिवम पुलकुटवार,ग्रामसेवक सचिन तावरे,प्रतिष्ठित नागरीक बंडू ढाकणे,संजू ठाकणे,मुंजाजी राजपंगे साने गुरूजी विद्यालय येस्तार चे मुख्याध्यापक सुनील जाधव पर्यवेक्षक डी.जे. तुमराम विवेकानंद मठपती सौ.वनिता वाडीकर,श्रीमती आर्चना पाष्टे आदि मतदारांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन तेलंगे तर आभार शिवकुमार गुळवे यांनी मानले.