अहमदपूर पोलीसांची दमदार कामगिरी ; बस स्थानकात चोरी करणाऱ्या महीलांना दोन दिवसात केले जेरबंद

0
अहमदपूर पोलीसांची दमदार कामगिरी ; बस स्थानकात चोरी करणाऱ्या महीलांना दोन दिवसात केले जेरबंद

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील बस स्थानकात गर्दीचा फायदा घेवून दि 27 एप्रिल रोजी महीला प्रवाशाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरी करण्यात आले होते व तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा अहमदपूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात चोरी करणाऱ्या तीन महिला आरोपींना छ्त्रपती संभाजी नगर येथे जाऊन अवघ्या दोन दिवसात दमदार कामगिरी करून अहमदपूर पोलीसांनी पकडून जेरबंद केले आहे.

याविषयी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सध्या सगळीकडे लग्नसराईची धामधुम असुन अहमदपूर बस स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी पाहायला मिळत असे या गर्दीच फायदा घेऊन दि.27 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजण्याचे सुमारास अहमदपूर बस स्थानकात महिला किरण अमीत स्वामी वय-28 वर्षे रा. तोगरी ता. उदगीर ह्या नांदेडकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना याच गर्दीचा फायदा घेवून चोरटयांनी त्यांच्या बॅगेची चैन उघडून आतील 6 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागदागीने व रोख 4500/- रुपये असे एकूण 3,34,500/- रुपयांचा मुददेमाल चोरून लंपास केला होता सदरील महीलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुन्हा रजि. क्रमांक 270/2024 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्हयाचा तपास पोउपनि रवी बुरकुले यांच्याकडे देण्यात आला होता. दि 28 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन अहमदपूरचे प्रभारी अधिकारी प्रशिक्षणार्थी सहा. पोलीस अधिक्षक नवदिप अगरवाल यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकास मार्गदर्शन करून सुचना करून पोलीसांनी अतीशय शिताफीने गोपनीय बातमीदाराकडून सदर गुन्हा केलेल्या आरोपींची माहिती काढून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न केले.

सदरील गुन्हयातील संशयीत आरोपी महिला हया छत्रपती संभाजी नगर येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना सहा. पोलीस निरीक्षक काशीनाथ महांडूळे क्राइम ब्रँच संभाजीनगर यांनी ताब्यात घेवून अहमदपूर पोलीसांना कळविले त्यावरून डी. बी. पथक अहमदपूर यांनी छत्रपती संभाजी नगर येथे जावून आरोपींना ताब्यात घेतले.

सदरील गुन्हयातील संशयीत आरोपी महिला न 1. देवूबाई टिपा शिंदे वय-50 वर्षे 2. मिरा दिपक शिंदे वय-22 वर्षे 3. पुजा शंकर जाधव वय-20 वर्षे सर्व रा मंगरुळ ता घनसांगवी जि. जालना असे असुन या सर्व महीलांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतल्याने त्यांना गुन्हयात अटक करून त्यांनी चोरी केलेले 6 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने रोख 2500/- रुपये एकूण 3,32,500 रुपयांचा मुददेमाल पो.स्टे. गेवराई हददीतून जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत सदरील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमय मूंढे, लातूर, अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, मणिष कल्याणकर, अहमदपूर यांनी पो.स्टे अहमदपूर येथील प्रशिक्षणार्थी सहा. पोलीस अधिक्षक नवदिप अगरवाल यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या पोउपनि रवी बुरकुले, डी.बी. पथकातील पोना तानाजी आरदवाड, पोकॉ डबेटवार, पोकॉ पुठेवाड, पोकॉ धुळगंडे, पोकॉ कज्जेवाड, पोकॉ आंबीलवाड यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. तसेच सहा पोलीस निरीक्षक काशीनाथ महांडूळे क्राइम ब्रँच छत्रपती संभाजीनगर व पोलीस निरीक्षक बांगर पो.स्टे. गेवराई जि. बीड यांनी मदत केली सदरील गुन्हयाचा तपास पोउपनि रवी बुरकुले हे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *