महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

0
महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर, डॉ. मारोती कसाब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलना बरोबरच राष्ट्र उद्धाराची कार्य केले. तसेच ग्रामीण जनजीवनाचे चित्रण ही केले. या बरोबरच शिक्षणाचे महत्त्व ही सांगितले, असे ही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. किरण गुट्टे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, प्रा. प्रकाश गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *