मराठा, धनगर समाजाची सत्ताधाऱ्याकडून फसवणूक – भुषणसिंह राजे होळकर
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
अहमदपूर (गोविंद काळे) : समाजा समाजात भांडणे लावून स्वताची पोळी भाजप भरीत आहे, त्यामुळे आज राज्यातील सामाजीक सलोखा बिधडत चालला आहे. धनगर, मराठा या समाजाला आरक्षण देतो म्हणून विदयमान सरकारने फसवले आहे, आता हे सगळे उघड झाले आहे. त्यामुळे आता त्यांच्या भुलाधापांना बळी न पडता काँग्रेस महाविकास आघाडीला सर्व समाजाने पाठींबा दयावा, असे आवाहन पुण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी केले.
ते लातूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ सोमवार दि. २९ एप्रिल रोजी दुपारी अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे आयोजीत सभेत भूषणसिंह राजे होळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख त्याच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनायकराव पाटील, लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश कदम, एन. आर. पाटील, चंद्रकांत मद्दे, रामभाऊ बेल्लाळे, सिराज जहागीरदार, भारत रेड्डी, सोमेश्वर कदम, ज्योतीताई पवार, निलेश देशमुख, डॉ. सतीश बिराजदार, आर. डी,शेळके, भाग्यश्री क्षिरसागर,सांब महाजन, व्यंकटराव पाटील, श्रीकांत बनसोडे, हरिभाऊ येरमे, मारुती माने, अशोक पाटील आदींसह काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलतांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर म्हणाले की, आज देशाची परिस्थिती पाहताना आम्हाला वाटले आज लोकांबरोबर उतरण्याची गरज आहे. महाराष्ट्राची भूमी ही वारक-यांची आहे, तसेच ही भूमी धारक-यांची ही आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेची
कामे करण्याची शिकवण दिली. जनतेला केंद्रस्थानी मानून अनेक नेत्यांनी काम केले. परंतु आज राजकारणात एकमेकांना शत्रू म्हणून पाहिले जाते. सन २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले अच्छे दिन आनेवाले है परंतु ते आले नसल्याने त्यांचा खोटारडेपणा उघडा पडला असुन डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी युवकासह असंख्य मतदार व महिला भगिनींची उपस्थिती होती.