तोगरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मणराव दापके यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोगरी शाळेचे उपक्रमशील व आदर्श मुख्याध्यापक लक्ष्मणराव दापके यांचा सेवापूर्ती सोहळा शाळा व्यवस्थापन समिती, शाळेतील सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे गटशिक्षणाधिकारी शेख शफी तर प्रमुख पाहुणे म्हणून देवणी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय सिंदाळकर , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथराव मुडपे, विस्तार अधिकारी सुनील राजे, विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील ,उदगीर उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख विजयकुमार चव्हाण, तोंडचिरचे केंद्रप्रमुख श्रीदेवी स्वामी, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन माधव अंकुशे , शिक्षक समिती महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख किशनराव बिरादार, व्ही.एस.कुलकर्णी, केंद्रीय प्राथमिक शाळा उदगीर उर्दूचे मुख्याध्यापक शेख जाकीर हुसेनसाब, सोमनाथपूरचे मुख्याध्यापक मल्लिकार्जुन स्वामी, प्राथमिक शाळा मोघा चे मुख्याध्यापक नारायण देमगुंडे व मुख्याध्यापक लक्ष्मण दापके यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई विठ्ठलराव दापके, सासुबाई सुनीता भोसले, सासरे दामोदर भोसले, पहिल्या बॅचेचे विद्यार्थी नेताजी वाघाळे, विष्णू येलगटे,दिगंबर मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुख्याध्यापक लक्ष्मणराव दापके यांना शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांतर्फे मानपत्र प्रदान करण्यात आले. शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांतर्फे, मुख्याध्यापक लक्ष्मणराव दापके त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुरेखा लक्ष्मणराव दापके, मातोश्री काशीबाई विठ्ठलराव दापके यांचा भर आहेर व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात उदगीरचे गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक लक्ष्मण दापके यांनी आपल्या मुख्याध्यापक पदाच्या कार्यकाळात विद्यार्थी गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविले, शालेय परिसर विविध वृक्ष लागवड करून नटवला, शाळेला विविध भौतिक सुविधा प्राप्त करून दिल्या, सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावून शाळेला दोन लक्ष रुपयांचे बक्षीस मिळवून दिले. दापके यांनी कल्पक नियोजनातून शाळेच्या परिसरात अतिशय सुंदर परसबागेची निर्मिती केली.सतत दोन वर्षापासून तालुका व जिल्ह्यामध्ये शाळेच्या परसबागेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. ग्रामीण भागातल्या विजया येरनाळे या सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थिनीला इस्रो येथे विमानाने जाण्याची संधी प्राप्त करून दिली. सदरील काळामध्ये इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सतत घवघवीत यश मिळवले आहे. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धेमध्ये शाळेचे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.मुख्याध्यापक लक्ष्मणराव दापके यांच्या कामाचा हा वारसा त्यांच्या सहकारी शिक्षकाने असाच पुढे चालू ठेवावा, असे आवाहन गटशिक्षण अधिकारी यांनी केले. तत्पूर्वी सकाळच्या वेळी मुख्याध्यापक लक्ष्मणराव दापके त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुरेखा लक्ष्मणराव दापके, मातोश्री काशीबाई दापके यांची ढोल ताशा व टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भव्य अशी गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील ग्रामस्थांतर्फे घराघरामधून त्यांचा शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन व पुष्पवृष्टी करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक रमेश कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाल बहादुर शास्त्री शाळेच्या श्रीमती नीताताई मोरे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज म्हादा यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थित सर्वांना गंगाधर शिखरे, मल्लिकार्जुन अलिबादे व रमेश संभाळे यांच्यातर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली. हा आगळावेगळा सेवापुर्ती सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवराज महादा, सदस्य पंडितराव महादा, विजयकुमार शेळके , सुरज पाटील, सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव महादा, मुख्याध्यापिका श्रीमती उमादेवी रामशेट्टी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.