सामाजिक कार्यकर्ते महेश देवणे यांनी दुर्मीळ घुबडाच्या पिलाला दिले जीवदान
अहमदपूर (गोविंद काळे) : सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून, सूर्यदेव प्रत्यक्षात आग ओकत असल्याची जाणीव होत आहे. या उन्हाच्या तीव्रतेने पशु, पक्षी, प्राणी आणि मनुष्याच्या अंगाची लाही- लाही होऊन जीव कासावीस होत आहे. अशा अवस्थेत शेतशिवारात पशु पक्षी अन्न पाण्याच्या शोधात भटकंती चालू आहे. असे एका दिवसादिवशी पाण्याच्या शोधात व्याकुळ झालेल्या घुबडाच्या पिल्लास पाणी पाजून जीवदान दिले. तसेच एका झाडाच्या बुंध्यावर नेऊन सोडत सामाजिक कार्यकर्ते महेश देवणे सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पार पाडले.
ग्रामीण भागासह शहरातील महिला या पक्षास अशुभ मानतात. खेडवळ भाषेत घुबडावणी तोंडाच्या म्हणून हिणवतात, तसे पाहिले तर हा पक्षी भीतीदायकच दिसतो. परंतु लक्ष्मी मातेचे वाहन व शुभ असलेला आणि दुर्मिळ होत चाललेला सर्वात बुद्धिमान पक्षी म्हणून त्याची ओळख आहे. या पक्षाचे अनेक फायदे, रहस्य आणि आख्यायिका सुद्धा आहेत. याविषयी अधिक तर्क वितर्क न लावता या प्रखर, तीव्र उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांसाठी किमान चारा पाण्याची सोय होणे महत्त्वाचे आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते महेश देवणे हे एका साक्षगंध सोहळ्यास उपस्थिती दर्शविण्यासाठी ग्रामीण भागात गेले
होते. वृक्षाच्या सावलीस वाहन लावून कार्यक्रम स्थळी निघाले असता, त्यांना झाडाच्या बुडास रक्तलोचनी घुबड किंवा चट्टेरी वन घुबडाचे पिल्लू दिसले. ते पाण्याच्या व्याकुळतेने गुपचूप दडून बसले होते. त्यास अलगद हात लावून पाहिले असता हालचाल होत नव्हती, अशा अवस्थेत त्या पिलास पाणी पाजून इतर मित्राच्या सहाय्याने त्याचा दुसरा जोडीदार असलेले एक पिल्लू झाडावर दिसले. त्याच्याजवळ त्यास नेऊन ठेवले. तरी ग्रामीण भागात, शेत शिवारात दूरवर पाण्याची उपलब्धता नाही अशा ठिकाणी पक्षासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करून दुर्मिळ होत असलेल्या पक्षांना जीवदान द्यावे असे आवाहन देवणे यांनी केले आहे.