लोकसभेसाठी अहमदपूर – चाकुर विधानसभा मतदारसंघात ६३.१२ टक्के मतदान

0
लोकसभेसाठी अहमदपूर - चाकुर विधानसभा मतदारसंघात ६३.१२ टक्के मतदान

लोकसभेसाठी अहमदपूर - चाकुर विधानसभा मतदारसंघात ६३.१२ टक्के मतदान

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया दि. ७ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली. यात अहमदपूर चाकुर विधानसभा मतदारसंघात २ लाख १३ हजार ७२६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून त्याची टक्केवारी ६३.१२ टक्के आहे.

लातूर मतदारसंघातील लोकसभा अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघात ३६७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून या प्रक्रियेसाठी १७५३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती तर ४५ क्षेत्रीय अधिकारी आणि ४५ मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली होती ईव्हीएम मशीन बाबत कुठेही तक्रार आली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले अगदी पोलीस बंदोबस्तात सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यात ३ लाख ३८ हजार ६१४ मतदारांपैकी २ लाख १३ हजार ७२६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात न लाख ७८ हजार ६६० पुरुष मतदारांपैकी १ लाख १५ हजार ६३० पुरुषांनी मतदान केले असून १ लाख ५९ हजार ९५४ महिला मतदारापैकी ९८ हजार ०९६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
या मतदारसंघातील दोन, तीन बुथांवर सायंकाळी अचानक मतदान करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्यामुळे अडचण येऊन ठरवून दिलेल्या वेळेत मतदान प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सायंकाळी ६. ची अधिकृत अकडेवारी रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध झाली नसल्याने दि ८ मे रोजी सकाळी ११ : ०० वाजता ६३.१२ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी महसुल विभाग नायब तहसीलदार अक्षय म्हेत्रे यांनी दिली
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे , तहसीलदार शिवाजीराव पालेपाड उप- विभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर प्रशिक्षणार्थी पोलीस निरिक्षक तथा उप-अधिक्षक नवदिप अगरवाल , सहाय्यक पोलीस निरिक्षक खंदारे महसुल विभाग नायब तहसीलदार अक्षय म्हेत्रे निवडणुक नायब तहसीलदार बनकर यांनी अथक परिश्रम घेतले मतदार संघात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सुनेगाव ( सांगवी ) येथील गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी (लातुर- नांदेड नॅशनल हायवेवर कट पॉईंट व बस थांबा करण्यात यावा ) या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. सदर बुधवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकाही नागरिकांनी मतदान केले नसून ग्रामस्थांकडून शंभर टक्के बहिष्कार पाळला गेला. केवळ बुथ वरील दोन कर्मचाऱ्यांनी यावेळी मतदान केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *