माय राखी फॉर माय सोल्जर ब्रदर्स(यशवंत विद्यालयात”एक धागा शौर्याचा” भारतीय सैनिकांना राख्या पाठविण्यात आले.)
अहमदपूर ( गोविंद काळे )
यशवंत विद्यालय अहमदपूर येथे ‘माय राखी फॉर माय सोल्जर ब्रदर्स’ हा देशभक्ती, बंधुभाव निर्माण करणारा उपक्रम राबविण्यात आला.येथिल विद्यार्थीनींने रंक्षाबंधनानिमित्त देशाचे रक्षण करणारे सीमेवरील जवानांना स्वतः हाताने राख्या तयार करुन राखीचा एक धागा देशाचे रक्षण करणाऱ्या सिमेवरील भावांसाठी पाठवून देण्याचे संकल्प हाती घेतले. कलाविभागाचा एक विशेष उपक्रम म्हणून या राख्यां मधून निवडक राखी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी,तसेच स्थल सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी,वायु सेनाप्रमुख एअरमार्शल वी.आर.चौधरी,
जल सेनाप्रमुख एडमिरल
दिनेश कुमार त्रिपाठी,या तीनही दलातील प्रमुखांना राख्या
पाठविण्यात आल्या.
राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो.राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.
रक्षा बंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधून रक्षणाचे वचन घेत असते. मात्र देशातील सर्व बहिणींचे रक्षण करणारे भारतीय लष्करातील जवान रक्षा बंधनाच्या दिवशी सिमेवरच तैनात असतात. त्यांना आपल्या बहिणीकडे जाता येत नाही.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ५०० राख्या बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेली या राख्या सैनिकांपर्यंत पोहचविण्याचे काम विद्यालयातील उपक्रमशील कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी केले.
वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी. बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डाँ अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डाँ भालचंद्र पैके,उपसचिव डाँ सुनिताताई चवळे, मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्य.माधव वाघमारे पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे,शिवाजी सूर्यवंशी आदिनी अभिनंदन व कौतुक केले.