समता नगर प्रभाग तेरा मध्ये रोड व नाली करा अन्यथा 14 जुलै ला प्रहार च्या वतीने रस्ता रोको 

समता नगर प्रभाग तेरा मध्ये रोड व नाली करा अन्यथा 14 जुलै ला प्रहार च्या वतीने रस्ता रोको 

उदगीर (प्रतिनिधी) : समता नगर येथील शाहू चौक ते पुंडे च्या घरा पर्यंत रोड मंजूर असून देखील आज पर्यंत केलेला नाही. तर सुरेश बिरादार यांचे घर ते खुरेशी पाशा पटेल यांच्या घरापर्यंत मागील पंचविस वर्षे झाले रोड व नाली झालेले नाही. नगरपरिषद यांना निवेदन देवुन सुध्दा आजपर्यंत रोड, नाली झालेला  नाही .म्हणून उपजिल्हाधिकारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे, उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे ,विधान सभा अध्यक्ष सुर्यभान चिखले, उपाध्यक्ष संदीप पवार, सचिव अविनाश शिंदे, शहर सरचिटणीस चरणसिंग चौहान, सहसंपर्क प्रमुख सुनील केंद्रे, सहसचिव  बालाजी बिरादार, नळगिर सर्कल प्रमुख विलास भंडे,सुरेश बिरादार, विश्वनाथ मामा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात रोड व नाली करून समता नगर येथील रहिवाशांना न्याय द्यावा अन्यथा चौदा जुलै रोजी शेतकी निवास येथे प्रभागातील नागरिक व प्रहार च्या वतीने रस्ता रोको करण्यात येणार आहे. असे निवेदनात म्हणले आहे.

About The Author