मतदार संघातील सामान्य नागरीकांना दिलेल्या धोक्यासाठी उत्तम पर्याय म्हणून मी उभा आहे -अहमदपूर-चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार माधव जाधव यांचे प्रतिपादन
माधव रंगनाथ जाधव यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली व जाहीर सभा
अहमदपूर ( गोविंद काळे) मतदार संघातील दोन्ही पाटलांनी सामान्य जनतेला दिलेला धोक्यासाठी मी एक उत्तम पर्याय म्हणून निवडणुकीला थांबलो असुन अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहमदपूर-चाकूर मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने मला प्रचंड मतांनी निवडुन द्यावे असे प्रतिपादन अहमदपूर-चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार माधव जाधव यांनी जाहीर सभेत केले.
ते येथील निजवंत नगर येथे दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जाहीर सभेच्या सुरुवातीला सकाळी 11 वाजता निजवंते नगर अहमदपुर येथुन शहरातुन मुख्य रस्त्यावरुन भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नंतर या भव्य रॅलीचे जाहीर सभेत रुपांतर झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी ह.भ.प. मारोती महाराज धुळगुंडे लेंडेगावकर उपस्थित होते तर यावेळी व्यासपीठावर गिरीधर पौळ उपसरपंच खंडाळी, शिवकुमार हिप्परगे सरपंच परचंडा, विश्वनाथ कोळसुरे संस्थापक अध्यक्ष कुणबी सेना, लातुर, धोंडीराम मुठ्ठे, तानाजी कवडे, तालुका कार्याध्यक्ष लहुजी सेना, चाकुर, इब्रोज पटवेगर, माधव जाधव यांचे आई-वडील, बंधु माणिकराव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहीर सभेत पुढे बोलताना माधव जाधव म्हणले की, जाहीरनामा मी प्रत्येक घरोघर पोहचविला आहे. जाहीरनाम्यात एमआयडीसी मध्ये सोयाबिन प्रोसेसिंग असेल, उसावरचा गुळ उद्योगाचा असेल, तुरीचे डाळमीलचा उद्योग असेल, कच्चा माल जो उपलब्ध आहे तो पक्का कसा करता येईल, पक्क्या मालासाठी गुंतवणुक करणारे व्यापारी उपलब्ध करुन देणार आहे, यातुन बेरोजगार तरुण, तसेच महिलांना रोजगार मिळणार आहे, आदरणीय खंदाडे साहेब हे तळागाळातील सामान्य कुटुंबातुन आलेले आहेत. आमदार राहिलेले आहेत. आणखीणही त्यांची तळागाळाशी नाळ जुडलेली आहे, आणि त्यांना सर्वसामान्यांचा आवाज ओळखु येतो, ऐकु येतो, माधव जाधव कडे एक उत्तम पर्याय म्हणून आज जनता बघत आहे. जनतेला कळुन चुकलय की या दोन्ही पाटलांना सोडून माझ्या सोबत सर्वसामान्य जनता राहणार आहे. प्रस्थापित आमदारांनी 3500 हजार कोटीचा निधी आणला पण हा निधी कमिशन खाऊन या निधीचे वाटोळे केले. तालुकयातील कोणत्याच गावाला रस्ता व्यवस्थीत झाला नाही ना कुठलाच विकास झाला नाही. मतदारांनी जर मनात आणुन मला आमदार केले तर निधीतुन कमीशन खाणारा आमदार माधव जाधव होणार नाही. मी पुरोगामी विचाराचा आहे पुरोगामी विचारामध्ये कधीच भारतीय जनता पार्टी बसत नाही. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल त्यांना मी भविष्यात पाठींबा देणार आहे. आणि मी त्याच विचारात राहणार आहे. अजिबात भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार नाही. मी माझ्या आई वडिलांना देव मानतो माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो की कोणाच्या विरोधात उभा राहिलेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा घेऊन पुढे आलोय माधव जाधव हा माधवराव जाधव किंवा साहेब होणार नाही सर्व सामान्यांना सहज उपलब्ध होणारा मी लोकप्रतिनिधी आसणार आहे. आमचे कुटुंब पुर्वी हैद्राबाद येथे राहत होते आम्ही अत्यंत हालाखीच्या परिस्थितत जिवन जगले असुन माझे आई वडील तर विट भट्टीवर मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. सन २०१७ मध्ये सन्मानिय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातुन जि.प मतदार संघ खंडाळीतुन निवडणुक लढवुन जिंकुन येऊन पाच वर्षे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचे प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन मांडून प्रामाणिक पणे ते सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगीतले. मला कोणावर टिका करायची नाही, माझ्यावर सोशल मिडिया मधुन माझ्यावर काहीजन वैयक्तिक खालच्या दर्जाची टिका टिप्पनी करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर टिका न करता हिम्मत असेल तर कॉलेज रोडवरील माझ्या स्वराज ट्रॅक्टरच्या कार्यालयात येवून बोलावे. मी उत्तर देण्यास समर्थ आहे. माझा सगळ्यात मोठा आधार माझे आई वडील माझा पाठीराखा भाऊ. मला निवडून आणायला सामान्य जनतेचे असंख्य हात आहेत. अहमदपूर-चाकूर तालुक्याची जनता सर्वसामान्याच्या पाठीमागे उभे राहाणार आहे. बारा बलुतेदार आठरा पगड जातीतील लोकांचे एैरणीवरील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचवण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहण्यासाठी ताकत मला सर्वसामान्य जनतेनी दिली असुन निवडूण देण्याचे ठरवले आहे मी पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन जनतेसाठी उभा आहे म्हणुन निवडणुक विभागाच्या बॅलेट यंत्रावर माझा 18 हा क्रमांक आला आहे आणि भारतीय समाजातील 18 पगड जातीसाठी मी कार्य करणार करणार आहे या योगायोगाला सत्यात उतरवण्यासाठी मला येणाऱ्या 20 तारखेला रोड रोलर हे बटन दाबुन प्रचंड मतांनी विजयी करा असेही आवाहन शेवटी माधव जाधव यांनी केले.
अध्यक्षीय समारोप ह.भ.प. मारोती महाराज धुळगुंडे लेंडेगावकर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रताप गवळे यांनी मानले. या जाहीर रॅली व जाहीर सभेस अहमदपूर-चाकूर मतदार संघातील असंख्य जनता, कार्यकर्ते उपस्थित होते.