जान्हवी पवार ची राष्ट्रीय स्पर्धे साठी निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : 21 ते 23 डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय धनूरविद्या स्पर्धेत मलकापूरची जान्हवी पवार हिने 677 गुण घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. ही राष्ट्रीय स्पर्धा 7 ते 9 जानेवारी 2025 ला जयपूर (राजस्थान) येथे होणार आहे.
तसेच जान्हवीने 30 मिटर मध्ये सुवर्णं पदक, 20 मिटर मध्ये रजत पदक तर ओव्हरऑल सुवर्णं पदक जिंकले.
शिवम झेंडे व जान्हवी यांनी मिक्स टीम प्रकारात सुवर्णं पदक जिंकत लातूर जिल्ह्याचे नाव उंचावले. तसेच मारोती बिरादार यांनी लातूर जिल्ह्याचे प्रशिक्षक म्हणून नेतृत्व पार पाडले.
शिवम व जान्हवी हे गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत असून त्यांना प्रशिक्षक सुधीर पाटील व सुषमा पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जान्हवीला पुढील स्पर्धेसाठी संघटनेचे पदाधिकारी अशोक जंगमे, राजेश देवकर ,नवनाथ गरगटे व क्रीडा प्रेमी गजानन पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.