डॉ. मक़बूल अहमद यांचा स्वलिखित उर्दू साहित्यावर संवाद
उदगीर (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयागिरी महाविद्यालय येथे उर्दू विभागातील प्राध्यापक तथा प्रसिद्ध उर्दू साहित्यकार डॉ. मक़बूल अहमद यांचा “उर्दू काव्य, गझल आणि साहित्यिक टीका” या विषयावर प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात डॉ. अहमद यांनी उर्दू काव्यकलेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी उर्दू काव्य, गझल आणि त्यावरची साहित्यिक टीका याबद्दल विस्तृत चर्चा केली. त्यांच्या व्याख्यानात त्यांच्या उर्दू गझल प्रवासावर प्रकाश टाकून आणि त्यातील महत्वाच्या स्वलिखित गझल सादर करण्यात केल्या. डॉ. अहमद यांच्या लेखनातील सामाजिक आणि रसिक विचार आणि सखोल ज्ञान उपस्थितांना अत्यंत प्रेरणादायक वाटला. त्यांनी उर्दू गझल आणि काव्याची पारंपारिक आणि आधुनिक तत्त्वे यांचा समन्वय साधत उर्दू साहित्याच्या शास्त्रीयतेकडे सर्वांचे लक्ष वेधले. साहित्याच्या विविध अंगांचा विचार करतांना त्यांनी उर्दू साहित्याच्या समृद्ध परंपरेवर जोर दिला. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील आणि एस.जी.कोडचे, स्टाफ सेक्रेटरी डॉ.बी.डी. करंडे, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील यांनी डॉ. मक़बूल अहमद यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रभारी डॉ.पी.एस.शेटे मानले.