भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवावे : शहराध्यक्ष मनोज पुदाले
उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय जनता पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देत, हे अभियान प्रभावीपणे राबवावे. असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा माझी नगर सेवक मनोज पुदाले यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात पक्ष सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कार्यशाळा भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहराध्यक्ष मनोज पुदाले बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे उदगीर विधानसभा प्रमुख राहुल केंद्रे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, मनोहर भंडे,विजय निटूरे, माजी सभापती विजय पाटील, रामचंद्र मुक्कावार, सुरेंद्र आकनगिरे, शिवकुमार हाळे, बसवराज रोडगे, घोणसे मामा, गोविंद कोंबडे, शिवाजी भोळे, साईनाथ चिमेगाव,रुपेंद्र चव्हाण, अमर सुर्यवंशी, सरोजा वारकरे, रामेश्वर पवार, अमोल अनकल्ले, उषा माने, रमेश शेरिकर, आनंद बुंदे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना मनोज पुदाले म्हणाले की, आज भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणून ओळखला जात आहे. या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. स्व. अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून सुरू झालेली भाजपा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्षम बनली आहे. भारतीय जनता पक्षाने केंद्रात सलग तिसऱ्यांदा तर राज्यात पुन्हा एकदा सत्ता मिळविली आहे. या सत्तेचा उपयोग सामान्य जनतेच्या हितासाठी केला जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आपल्या पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन यावेळी शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी केले.
यावेळी राहुल केंद्रे यांनी अध्यक्षीय समारोपात बोलताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केल्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आपल्याला न भूतो न भविष्यती असे यश मिळाले आहे. आगामी काळातही पक्ष संघटनेच्या कार्यात असेच निष्ठेने काम करून पक्षाला अधिक बळकटी मिळवून द्यावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अँड. दत्ताजी पाटील यांनी केले.
यावेळी शिवकर्णा अंधारे, रुपेंद्र चव्हाण, लखन कांबळे, रामेश्वर पवार, विजय पाटील, रेणुका डुबुकवाड, अरुणा चिमेगावे , दिलीप मजगे, डॉ. चंद्रकांत कोठारे , राजकुमार लिंबाळे, देविदास सोनटक्के, सुभाष कांबळे, व्यंकट काकरे, धोंडीबा तेलंगपुरे, राम भोसले, सुनील गुडमेवार, राजकुमार सोनटक्के, राम मोतीराम, अनिल मुदाळे, शिवाजी पाटील, शिवा आडे, सचिन सूर्यवंशी, चेतन सूर्यवंशी, मारुती श्रीनेवार, कंवर सकट, विजय पवार, सुरज लासुने, साई वाघमोडे, ज्ञानेश्वर घंटे, ज्ञानेश्वर तेलंगे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.