सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकुटुंब साजरी केली दर्शवेळ अमावस्या
अहमदपूर ( गोविंद काळे ) भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषीशी निगडित अनेक सणवार असतात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या. शेतातील काळ्या आईची ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. आज गावातील सर्व लहान थोर शेतात वन भोजनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकुटुंब आपल्या शेतात जाऊन दर्शवेळ अमावस्या साजरी केली.
यावेळी बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, “शेती-माती ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. मराठमोळ्या सणांमधून आपण आपल्या मातीतल्या संस्कारांना जपतो. शेती आणि मातीशी आपली नाळ कायम घट्ट ठेवली पाहिजे. या निमित्ताने मी माझ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो. काळ्या आईच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या शेतकरी बांधवांना समृद्धी आणि सुबत्ता लाभो….
यावेळी माजी सरपंच साहेबराव जाधव, सभापती मंचकराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील, तसेच पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते.