उदयगिरीत सेवागौरव कार्यक्रम संपन्न
उदगीर : (एल.पी.उगीले ) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा. जोतिबा कांदे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एस. आर. नागोरी, उर्दू विभागातील डॉ. मकबूल अहमद हे नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाले असून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त सेवागौरव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, ॲड. प्रकाश तोंडारे,ॲड. अजय दंडवते, महादेव नौबदे, बसवराज पाटील मलकापूरकर, प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. जी. कोडचे यांची उपस्थिती होती.
सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलताना सहसचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया म्हणाले, सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतो. सचिव रामचंद्र तिरुके म्हणाले, उदयगिरीचे वैभव कायम राहावे, यासाठी सेवानिवृत्त प्राध्यापकांनी कायम योगदान द्यावे. अध्यक्षीय समारोप करताना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी म्हणाले, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संस्था कायम ऋणी राहील. आपल्यासारख्या प्रामाणिक व निष्ठावान कर्मचाऱ्यांमुळेच उदयगिरीचा नावलौकिक संपूर्ण विद्यापीठ परिक्षेत्रात आहे. तीनही सेवानिवृत्त प्राध्यापकांना त्यांनी भविष्यकालीन वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सेवागौरव कार्यक्रमादरम्यान प्रा. जोतिबा कांदे, डॉ. एस. आर. नागोरी, डॉ. मकबूल अहमद यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजकुमार मस्के यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिव डॉ. भालचंद्र करंडे यांनी तर आभार प्रा. सचिन कांबळे यांनी मानले.