श्यामलाल हायस्कूल च्या स्नेहा झेरकुंटे यांचे डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत घवघवीत यश !

0
श्यामलाल हायस्कूल च्या स्नेहा झेरकुंटे यांचे डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत घवघवीत यश !

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल हायस्कूल मधील स्नेहा महारुद्र झेरकुंटे या विद्यार्थिनीने डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिची डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या दुसऱ्या राउंड साठी निवड झालेली आहे. त्याबद्दल श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.सुपोषपाणि आर्य तसेच श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत खंदारे, पर्यवेक्षक राहुल लिमये, डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा तथा विज्ञान विभाग प्रमुख अविनाश घोळवे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे स्नेहा झेरकुंटे या विद्यार्थिनीस पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या, आणि अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अभ्यासातून विज्ञान संशोधनामध्ये रुची निर्माण व्हावी. यासाठी महाराष्ट्र विज्ञान शिक्षक मंडळातर्फे डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये शाळेतील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर स्नेहा झेरकुंटे ही विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन दुसऱ्या राउंडच्या परीक्षेसाठी ती पात्र झाली आहे. या विद्यार्थिनीस शाळेतील विज्ञान विषय शिक्षक तसेच पालक महारुद्र झेरकुंटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या उत्कृष्ट यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *