लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल रवाना.
उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल तुळजापूर मार्गे कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय, भौगोलिक ,सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी रवाना झाली.
शैक्षणीक सहलीला भा.शि.प्र.संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासुणे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वट्टमवार यांनी श्रीफळ फोडून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार, श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी,सहल प्रमुख श्याम गौंडगावे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.