प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के यांचा जाहीर सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांच्या षष्ठपूर्ती वाढदिवसानिमित्त तसेच प्राचार्य पदावर नियुक्ती झाल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ. राजकुमार मस्के यांचा भव्य जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता रघुकुल मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या सत्कार समारंभासाठी राज्यभरातून माजी विद्यार्थी व समाजातील विविध घटकातील चळवळीतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील माजी कुलगुरू तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे विद्यमान सदस्य, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ.देवानंद शिंदे यांना या सत्कार समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
सत्कार समारंभाच्या नियोजनासाठीची माजी विद्यार्थ्यांची तिसरी महत्त्वाची बैठक महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात नुकतीच पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश लांडगे उपस्थित होते.
या सत्कार समारंभासाठी माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के गौरव माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष डॉ.कांत जाधव, तसेच डॉ.सोमनाथ कदम, डॉ. मा. ई. तंगावार, डॉ. रामचंद्र पस्तापुरे, डॉ . गोरोबा रोडगे, डॉ. विलास गाजरे, डॉ. संभाजी पाटील, डॉ.अशोक केंद्रे, प्रा. बी. व्ही.भालके, डॉ. लहू वाघमारे, डॉ. बालाजी डीगोळे, डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, डॉ. मारोती कसाब, प्रा.बिभिषन मद्देवाड, डॉ. केरबा कांबळे, डॉ. विष्णू कांबळे, प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, श्री पी. एस. येवरीकर, अनंत कांबळे व माजी विद्यार्थिनी केले आहे.