उदयगिरीच्या विद्यार्थ्यांचे पोस्टर प्रेसेंटेशनमध्ये यश
उदगीर (एल.पी.उगीले): राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. टाकळे नम्रता, बिराजदार स्नेहा, शिंदे आशिष व अरुण मनोहर यांनी सहभाग घेतला होता. बीएससी तृतीय वर्षातील विद्यार्थिनी बिराजदार स्नेहा संजयकुमार यांना प्रथम पारितोषिक व बीएससी प्रथम वर्षातील विद्यार्थी अरुण मनोहर यांना द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. संघप्रमुख म्हणून प्रा. प्रशांत वाघमारे यांनी कार्य केले. या स्पर्धेतील यशस्वी झालेल्या व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य एस. जी. कोडचे, गणित विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र करंडे यासह सर्वांनी अभिनंदन केले.