शिवाजी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) शिवाजी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम.मांजरे होते.त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकताना डॉ.मांजरे म्हणाले, या भारताच्या पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, शिक्षणाची क्रांती घडवून आणली. यावेळी डॉ.व्ही.के.भालेराव, डॉ.एस.डी.सावंत, डॉ.ए.एच.पाटील, प्रबंधक बी.के. पाटील, व्ही.डी. गुरनाळे, आर.एम. लाडके, सौ.देवनाळे, सौ.शेडोळे, प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.डी.बी. मुळे यांनी तर आभार डॉ.ए.एस. टेकाळे यांनी मानले.