शिवाजी महाविद्यालयाच्या वैष्णवी श्रीकांत पाटील हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
शिवाजी महाविद्यालयाच्या वैष्णवी श्रीकांत पाटील हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

उदगीर (एल.पी.उगीले)
युवक व क्रीडा सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय पीपीटी चॅलेंज स्पर्धेतून शिवाजी महाविद्यालय, उदगीरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची विद्यार्थीनी कु. वैष्णवी श्रीकांत पाटील हिची केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने विकसित भारत यंग लीडरर्स डायलॉग 2025 अंतर्गत दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रीय युवक महोत्सवांतर्गत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या राष्ट्रीय महोत्सवामध्ये ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्त्री सबलीकरण या विषयावर महाराष्ट्रातील ज्या तीन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, त्यामध्ये वैष्णवीचा समावेश असून मराठवाड्यातून निवड झालेली ती एकमेव आहे. वैष्णवीच्या या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळ व शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर,सचिव पांडुरंग तुळशीराम शिंदे, सहसचिव हिरागीर सिद्धगीर गिरी,कोषाध्यक्ष गुंडेराव भाऊराव पाटील,संचालक रामराव नारायणराव एकंबे, महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ.आर. एम.मांजरे,सिनेट सदस्य डॉ. विष्णू पवार, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. संजय निटुरे, वैष्णवीचे वडील श्रीकांत पाटील, कार्यक्रमाधिकारी डॉ.अनंत टेकाळे,डॉ. डी. बी. मुळे, डॉ. डी. बी. कोनाळे, डॉ. यू.के.सिरसी, प्रा. जी. जी. सूर्यवंशी, प्रा. राम गिरी, श्रीनिवास आईटवार, आर.एम.लाडके, डी.डी. सूर्यवंशी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी केले, तर वैष्णवी पाटील हिने आपले मनोगत व्यक्त केले.
वैष्णवीच्या या कामगिरीचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, लातूर जिल्हा समन्वयक डॉ. केशव अलगुले यांनीही तिचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *