समर्थ विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती.
उदगीर (एल.पी.उगीले): तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी संस्थासचिव, प्राचार्य प्रमोद चौधरी उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, बाबळसुरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंकिता रामदास जायभाये या विद्यार्थीनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकांकिका सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर साधना निळकंठ शेवाळे हिने मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्राचार्य प्रमोद चौधरी म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे आचार विचार आचरणात आणले पाहिजे. तरच ही जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल. सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रसंगावर आधारित नृत्य, नाटिका माधुरी , अमरदीप बिरादार, राधिका संगमे, सविता मुंडे, योगिता मुंडे, नेहा कांबळे, जानवी जाधव, पायल माकणीकर, प्रांजली बिरादार, सोनाक्षी कांबळे यांनी सादर केली. प्रास्ताविक संतोष तेलंग यांनी केले. सुत्रसंचालन वर्षा कवडगावे यांनी केले तर आभार प्रा. के. डी. मुडपे यांनी मानले.