देवणी तालुक्यातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ
उदगीर (एल.पी.उगीले) : देवणी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, बीट अंमलदार विनायक कांबळे, गणेश बुजारे,अनिल घोडके, देवदीस किवंडे या पाच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली उदगीर शहर पोलीस ठाण्यात झाल्याने त्यांना निरोप देऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक माणिकराव डोके हे होते.
वैजनाथ लुल्ले सावकार,औदुंबर पांचाळ होनाळीकर, प्रा.अनिल इंगोले , रमेश मनसुरे, शिवा भाऊ कांबळे, किशोर निडवंचे, यशवंतराव पाटील, शरण लुल्ले, जावेद तांबोळी, बालाजी बनसोडे यांच्यासह सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.