महिला मुक्ती दिन व सावित्रीबाई फुले शिक्षिका दिन साजरा
अतनूर / प्रतिनिधी
३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जयंतीदिन ‘ महिला मुक्ती दिन ‘ व शिक्षिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त अतनूर येथे ३ जानेवारी रोजी येथील लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ उदगीर-अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ आणि जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अतनूर शाखेच्या कार्यालयात संयुक्त विधमाने आयोजित १९५ व्या. जयंती दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार माल्यार्पण अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर म्हणाले की, सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारणेच्या दीपस्तंभ आहेत. त्यांच्या कार्याने स्त्रियांच्या शिक्षणासाठी नवा मार्ग उघडला. समाजातील प्रत्येक घटकाने त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन स्त्री-पुरुष समानतेचा विचार स्वीकारला पाहिजे. सावित्रीबाईंच्या योगदानामुळे आज आपण प्रगतिशील आणि समानतेच्या दिशेने वाटचाल करू शकतो. त्यांच्या जीवनाची कहाणी हे केवळ प्रेरणेचे नव्हे, तर समाजसेवेच्या मार्गावर चालण्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक प्रदेशाध्यक्ष बी.जी.शिंदे हे होते. तर प्रमुखपाहुणे म्हणून अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे राज्य समन्वयक तथा लातूर ग्रामीणचे जिल्हाअध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, विधावर्धिनी इंग्लिश स्कुलचे प्राचार्य व्ही.एस.कणसे, पञकार बालासाहेब शिंदे, महिला प्रदेशध्यक्षा सौ.एस.बी.शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या प्रदेशअध्यक्षा सौ.रूक्मीण सोमवंशी, सचिव सौ.संध्या शिंदे, कुणबी मराठा महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्षा सौ.शुभांगना कणसे, कुणबी सेनेचे लातूर ग्रामीण अध्यक्ष व्यंकटराव कणसे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.एस.बी.शिंदे, सचिव मयुरी शिंदे, व्यंकटेश शिंदे, पञकार किशन मुगदळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन एस.जी.शिंदे यांनी केले. तर आभार प्रविण सोमवंशी यांनी मानले.