उदगीरात फुले दांपत्यास भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी एक दिवसाचे उपोषण

0
उदगीरात फुले दांपत्यास भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी एक दिवसाचे उपोषण

उदगीर (एल.पी.उगीले) : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मान करावा. या मागणीसाठी शुक्रवारी उदगीर तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लक्षणे उपोषण महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले भारतरत्न पुरस्कार कृती समिती उदगीरच्या वतीने आंदोलन करण्यात आले .
उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाकडे निवेदन देऊन उपोषणाची सुरुवात करण्यात आली होती.त्या निवेदनात नमूद केले आहे की, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यास केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा व पुण्यातील भिडे वाड्याचे स्मारकाचे काम जलद गतीने करण्यात यावे .या मागणीसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण कृती समितीच्या वतीने करण्यात आले .यावेळी सुधाकर दापकेकर,बालाजी फुले,डॉ . शरदकुमार तेलगाने ,संजय बिदरकर,संजय काळे,बनशेळकीचे सरपंच विलास शेळके,भगवान गायकवाड , बालाजी कांबळे , बाबासाहेब सूर्यवंशी , अनिता बिरादार , शिवाजी गायकवाड, सुशीलकुमार शिंदे , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगा राचुरे, मधुकर पांचाळ आदीसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *