सावित्रीबाई फुले जयंती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) येथील संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिच्यामुळे शिकली दिनदुंबळ्यांची मुले, तीच क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले !
ज्ञानज्योती पेटूनी मुलींना साक्षर केले, जन निंदेला न घाबरता अध्यापन कार्य सुरू ठेवले.अडचणीतल्या नारीला दिली मायेची सावली, दुष्काळातही बनली दिनांची माऊली. अशी अनेकानेक कार्य केलेल्या थोर समाजसेविका ज्ञानज्योती क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती
संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जगताप यांच्या संकल्पनेतून विद्यार्थिनींना स्वसंरक्षण व निरोगी जीवन देण्यासाठी दररोज सूर्यनमस्कार व आत्मरक्षण यांचे धडे देऊन तसेच त्यांच्या विचारांचा वारसा वाढवण्यासाठी भाषण व माहिती, वेशभूषा करून सादर करण्यात आली,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका अनिता जगताप , प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील वरिष्ठ शिक्षिका शिवगंगा डांगे, उषा खुळे, किरण पवार , वर्षा पवार ,प्रज्ञा बावचे, नीला कीर्ती यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी सुत्रसंचलन इयत्ता सहावी ची विद्यार्थ्यांनी निधी पाटील ,मानवी जाधव यांनी केले.यावेळी आरती थोरमोटे, अंकिता बेलकूने,समीक्षा वंगाटे, प्रतीक्षा येवरे, स्वरा पवार, सुष्टी उगीले,प्राप्ती जळकोटे, समीक्षा वट्टमवार ,प्रगती पाटील, चैतन्या कंदगुळे या विद्यार्थ्यांनीनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.