डॉ.नरसिंग कदम यांचा डॉ.रवींद्र शोभणे यांच्या हस्ते सत्कार
उदगीर – मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची बैठक वाई येथे नुकतीच पार पडली. त्यावेळी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबईचे सचिव डॉ.शामकांत देवरे यांनी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई च्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी महाविद्यालयातील कवी, कथाकार, वात्रटिकाकार, समीक्षक तथा संपादक साहित्यिक डॉ.कदम नरसिंग अप्पासाहेब यांचा सदस्य पदाचे ओळखपत्र,ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.यावेळी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे नवनियुक्त सदस्य, तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.