सचिव पदी भुसारे, सहसचिव बुद्रुक पाटील तर उपाध्यक्षपदी गायकवाड यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा अहमदपूरच्या वतीने कार्यकारिणी जाहीर करण्यात येवून सचिवपदी गजानन भुसारे, सहसचिव पदी प्रा. मारोती बुद्रूक पाटील तर उपाध्यक्षपदी शिवाजी गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी व जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांच्या सूचनेनुसार अहमदपूरच्या पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठ पत्रकार दिनकर मद्देवाड यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे सचिव पदी गजानन भुसारे, सहसचिवपदी मारुती बुद्रुक पाटील, उपाध्यक्षपदी शिवाजीराव गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी चंद्रकांत शिंदे, प्रा. रत्नाकर नळेगावकर, मेघराज गायकवाड, प्रा. बालाजी कारामुंगीकर, बालाजी काळे, बालाजी पारेकर, बालाजी तोरणे पाटील, गणेश मदने, उदयकुमार गुंडिले, धम्मानंद कांबळे आदिंसह पत्रकार बांधव उपस्थित होते.