भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आ.संजय बनसोडे यांची बिनविरोध निवड

0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आ.संजय बनसोडे यांची बिनविरोध निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रतिवर्षा प्रमाणे उदगीर शहरात विश्वरत्न, भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती मोठ्या थाटामाठात साजरी करण्यात येणार आहे. यावर्षीही महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी व नवीन कार्यकारणीची निवड करणे व मागील वर्षाच्या खर्चाचा गोषवारा देण्यासाठी शहरातील नालंदा बुद्ध विहारात माजी नगर सेवक श्रीरंग कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत सर्वानुमते राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांची अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
तर कार्याध्यक्षपदी देविदास कांबळे यांचीही निवड करण्यात आली. या बैठकीस माजी पोलीस उपनिरीक्षक दिलीप कांबळे,शशिकांत बनसोडे,
पप्पू गायकवाड, दिलीप सोनकांबळे, माजी नगरसेवक नरसिंग शिंदे, नामदेव बामणे,विठ्ठल कोल्हे, निवृत्ती भाटकुळे , शिवमूर्ती उमर्गेकर, बालाजी गायकवाड, उत्तम गायकवाड,ॲड. प्रफुल्लकुमर उदगीरकर,सुशीलकुमार शिंदे,गौतम कांबळे, माजी नगरसेवक विलास शिंदे, संघशक्ती बलांडे, सोनू पिंपरे , ॲड.वर्षा कांबळे, वैशाली कांबळे, मनोज माणसे, प्रदीप महापुरे, किरण शिंदे, शत्रुगण गायकवाड, सुधीर घोरपडे, निखिल कांबळे, पप्पू कांबळे, सुधीर बलांडे , बाबासाहेब सुर्यवंशी, अनिल सोमवंशी, शशिकांत तलवारे, उमाकांत बनसोडे, प्रदीप गवळे, कपिल शिंदे,नितीन गायकवाड, नरेश चांदे, सागर सोनकांबळे,राजकुमार माणसे, अजय पारखे , सुदर्शन सांडोळकर, बादशहा कांबळे, ऋषी लांडगे, आकाश कस्तुरे, राहुल कांबळे, विशाल हळ्ळीकर, राम सोनवणे, प्रणव कांबळे,पवन मसुरे, नागेश कांबळे, बबलू सुळकेकर, बबलू मसुरे, महेश कांबळे, आदी भीमसैनिक,समाज बांधव, विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!