रामनवमी निमित्त सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन, विजेत्यांना पारितोषिक वितरण

उदगीर (एल.पी. उगीले) श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने रामनवमी च्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. युवा पिढीला शारीरिकदृष्ट्या सक्षम व बळकट बनवण्यासाठी आणि सुदृढ राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री व उदगीरचे आमदार संजयभाऊ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोलभैया निडवदे, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटील, 2025 रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष अजय नवरखेले, माजी नगरसेवक अनिल मुदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
चार वयोगटांमध्ये स्पर्धा संपन्न
ही स्पर्धा चार वयोगटांमध्ये घेण्यात आली, जिथे 40 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
शून्य ते १३ वर्ष वयोगट:
प्रथम क्रमांक – प्रथमेश बिरादार, द्वितीय क्रमांक – बालाजी कुसळकर,
तृतीय क्रमांक – गणेश किंवडे,
१४ ते २० वर्ष वयोगट:
प्रथम क्रमांक – वीरेंद्र बिरादार,
द्वितीय क्रमांक – अंकुश मुळे,
तृतीय क्रमांक – विजय होळकर,
२१ ते ४० वर्ष वयोगट:
प्रथम क्रमांक – गिरीश वाघमारे,
द्वितीय क्रमांक – विश्वजीत जाधव,
तृतीय क्रमांक – विनोद कांबळे,
४० ते ५० वर्ष वयोगट:
प्रथम क्रमांक – सतीश राजेंद्र पाटील
द्वितीय क्रमांक – प्रताप बळीराम बिरादार,तृतीय क्रमांक – निवृत्ती पांडुरंग बिडवे स्पर्धेतील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमोल निडवदे , संतोष फुलारी, आशिष अंबरखाने, प्रशांत मांगुळकर, अभिजीत पाटील, शुभम लोणीकर, नितीश शिरसे, अजय कबाडे, शुभम सुपारे, किशोर रोडगे, आकाश चव्हाण, गजानन राजुरे, प्रशांत मंमदापुरे, गणेश गायकवाड, अमोल अनकले, अरविंद शिंदे, सागर बिरादार, परमानंद निलंगे, अमोल बिरादार, डॉ. विद्यासागर अचोले, दीपक नेत्रगावे, कल्लाप्पा स्वामी, राजेश शेटकार यांच्यासह आदिने परिश्रम घेतले.
या स्पर्धेने युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण केला असून, शारीरिक सुदृढतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भविष्यातही अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.