संभाजी ब्रिगेडकडून देवणी चे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांना रस्त्या दुरुस्तीचे निवेदन

उदगीर (एल. पी. उगीले) संभाजी ब्रिगेड लातूर व देवणी शाखेच्या वतीने देवणी चे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांना इंद्राळ, लक्ष्मी नगर,आंबेगाव, येनगेवाडी, देवणी या रस्त्याची अवस्था वाईट झालेली आहे. हा रस्ता त्वरित डांबरीकरण करण्यात यावा, तसेच बोळेगाव, वडमुरंबी, आंबेनगर, आंबेगाव व दवनहिप्परगा ते अचवला पाटी हे तिन्हीही रस्ते त्वरित चालू करण्यात यावेत असे निवेदन देण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने, विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तमरावजी फड,जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री बाळासाहेब चिंचोलकर,देवणी तालुका अध्यक्ष शिवश्री लक्ष्मण देवंगरे,उपअध्यक्ष विनोद कोतवाल,सचिव परमेश्वर भंडे,सह सचिव महेश भंडारे, कार्याअध्यक्ष सुमित पाटील, सदस्य दिपक कल्याणकर, प्रविण चापटे, माधव सुडे, महेश विळेगावे, कृष्णा माने,डॉ. गुणवंत बिरादार इत्यादी उपस्थित होते.