जिजाऊ रथयात्रा प्रेरणा देणारी ठरणार- ना. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (एल. पी. उगिले)
राजमाता जिजाऊ रथयात्रा समाजाला प्रेरणा देणारी आणि नव्या पिढीला इतिहासाची जाण करून देणारी ठरेल असा विश्वास वाटतो असे विचार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
भोसले गढी वेरूळ ते लाल महल पुणे आयोजित जिजाऊ रथयात्रा 2025 निमित्ताने संस्कृती गार्डन, अहमदपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रथयात्रेचे स्वागत करून उपस्थित सर्वांशी संवाद साधताना ते बोलत होते.
स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊंचा एकीचा-नेकीचा, समानतेचा आणि बहुजन समाजातील महापुरुषांचा समतेचा, सामाजिक एकीचा विचार घेऊन निघालेला जिजाऊ रथ अहमदपूर येथे आला. मराठा सेवा संघ गेल्या ३५ वर्षांपासून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी परिवर्तनवादी, प्रगतशिल आणि सकारात्मक कार्य करीत आहे. समाजाच्या हितासाठी विविध ३३ कक्षांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशपातळीवर कार्यरत असलेल्या मराठा सेवा संघाने अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले आहेत.
समाजा समोर असणारी अनेक आव्हाने सर्व जाती धर्मामध्ये सामाजिक,जातीय,धार्मिक सलोखा राखने व युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी यांचे मूलभुत प्रश्नांची व हक्क अधिकार याची जनजागृती व समन्वय साधन्यासाठी जिजाऊ रथयात्रा आयोजित केल्याबद्दल सर्वांचे कौतुकही याप्रसंगी ना. बाबासाहेब पाटील यांनी केले.
पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून यापूर्वी मराठा सेवा संघाने जिजाऊ रथयात्रेचे यशस्वी आयोजन केले आहे. त्याला राज्यभरातून उत्फुर्त व उत्साह वर्धक प्रतिसाद मिळाला आणि त्या मधून सामाजिक सलोख्याची उत्तम बांधणी झाली.
युवक-युवती, विद्यार्थी, शेतकरी, प्रौढ महिला,पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी, समाजाला एकसंघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधुभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा २०२५ अंतर्गत बहुजन-मराठा जोडो अभियान अभिमानास्पद आहे. एकीचे बळ हेच समाजाच्या उन्नतीचे पायाभूत तत्व आहे.असेही सांगितले.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवश्री गंगाधरजी वनवरे, शिवश्री विनायकराव पाटील, शिवश्री सौरभ खेडेकर, शिवश्री ज्योतीताई पवार, शिवश्री अर्जुन तनपुरे, शिवश्री प्रीतीताई खेडेकर, शिवश्री संभाजी नवघरे, शिवश्री प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष शिवश्री रोहन जाधव, शिवश्री गोविंदराव शेळके, शिवश्री अशोकराव चापटे, शिवश्री ज्ञानोबा भोसले, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.