हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. संजय बनसोडे

0
हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील देवर्जन जवळील श्री क्षेत्र हत्तीबेट ही भूमी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे.सध्या पर्यटनाचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला असुन हत्तीबेटाच्या विकासासाठी आपण कायम प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रात एक नामांकित पर्यटन स्थळ म्हणून देशात हत्तीबेटाचा समावेश होण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही माजी क्रीडामंत्री आ. संजय बनसोडे यांनी यांनी दिली.
हत्तीबेट गडावर स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भक्त मंडळाच्या वतीने आयोजित आ. संजय बनसोडे यांच्या साखरतुला कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, श्याम डावळे, वसंत पाटील, शंकर रोडगे, देवर्जनचे सरपंच अभिजित साकोळकर, बाळासाहेब मरलापल्ले, हणमंत हंडरगुळे, विष्णु संपते, गंगापुरचे सरपंच नागभुषण बिरादार, ज्योती बानापुरे, व्ही.एस. कुलकर्णी, युवराज धोतरे,भागवत गुरमे, अंतेश्वर रोडगे, सचिन सुर्यवंशी, गंगाधर दवणहिपरगे, गणेश चव्हाण, संदिपान सुर्यवंशी, अरविंद गिलचे, बस्वराज गिलचे, तानाजी पिटले, बालाजी पुरी, दत्ता खटके, गंगाधर बिरादार, विनोद रोडगे, राम कुसळकर, सुखानंद रोडगे, नामदेव चित्ते, क्रांती सुर्यवंशी, सुमन चव्हाण, रेणुका चव्हाण, निता राठोड, शिला वंटेकर, जगदेवी माचोळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. बनसोडे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात हत्ती बेटाच्या विकासासाठी जवळपास सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय या भागातील रस्ते, सभागृह अशा अनेक विकासकामा मुळे या परिसराला दिवसेंदिवस वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे. या गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही दिवसें दिवस वाढत असल्याने या हत्ती बेटावर नागरीकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हत्तीबेट पर्यटन विकास समितीचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!