गुडी पाडवा निमित्य दिड लाख भाविकांनी घेतले उदागिर बाबाचे दर्शन

उदगीर (प्रतिनिधी) उदगीरचे आराध्य दैवत उदागिर बाबा महाराज समाधी उदगिर किल्लात गुडीपाडवा व नववर्षानिमित्त शहर व परिसरातील दिड लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यात असलेले उदगीरचे आराध्य दैवत उदागिर बाबा महाराज यांची संजीवन समाधी स्थळी उदागिर बाबा महाराज उत्सव हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, किर्तन तसेच दररोज महारुद्र अभिषेक आदि विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ झाला. हरिनाम सप्ताह व ग्रंथाराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाली.
उदागिर बाबा महोत्सवानिमित्त राधाई ब्लड बॅंक तर गुडीपाडव्या निमित्य नागप्पा अंबरखाने ब्लड बॅंकेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन किरण महाराज यांच्या हस्ते सद्गुरु उदागिर बाबाच्या प्रतिमेचे पुजन करुन झाले.यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले ,मादलापुरचे सरपंच उदसिंह मुंडकर ,डाॅ विजय चिखले आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात एकुण ४१ रक्तदात्यांनी रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदविला. उदागिर बाबा उत्सवा निमित्त सकाळी १० वाजल्या पासुन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विविध भजनी मंडळाचे भजन संपन्न झाले. यात गोपाळ जोशी, प्रा. जामखंडे, उध्दव महाराज हैबतपुरे, यांच्या व इतर भजनी मंडळांनी भजन गायन करुन सेवा केली.
उदागिर बाबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शेटकार गल्ली येथे गणेश मंडळाच्या वतीने अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली. महेश तोडकर, अजय शेटकार, तम्मा शेटकार, उपस्थित होते. तर नकाशे परिवाराच्या वतीने व किल्ला गल्ली युवक मंडळाच्या वतीने जलपानाची व्यवस्था केली होती. भाविक भक्तांना योग वेदांत सेवा समितीच्या वतीने शर्बत ची व्यवस्था केली होती. यावेळी सेवानिवृत्त अभियंता सामेश्वर हुडे यांच्यासह सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते.