सरदार वल्लभाई पटेल विद्यालयात रमजान ईद निमित्त मुस्लिम विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

उदगीर (एल.पी.उगीले)
राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयात रमजान ईद निमित्त इयत्ता चौथी वर्गाचे वर्गशिक्षक पटवारी आचार्य व त्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व मुस्लिम विद्यार्थ्यांना फळे वाटप केली. यावरून बंधू बहिणीचे नातेदृढ व्हावे व समाजातील जाती धर्माची दरी दूर व्हावी, व एकमेकांमध्ये प्रेम, आपुलकी सहकार्याची भावना निर्माण व्हावी. यामुळे वर्ग शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला उपक्रम घेतला. सर्व मुस्लिम विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला.विद्यालयाच्या प्रधानाचार्य मंजुषा ताई कुलकर्णी व इतर सर्व शिक्षक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.