श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दरबारात उसळला जनसागर

उदगीर (एल.पी.उगीले)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित श्री.स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार केंद्र रामचंद्र नगर नांदेड रोड उदगीर या मुख्य दरबारात ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले.सकाळी 8:00 वाजता आरती, नंतर 8:15 ते 9:30 हवनयुक्त श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचे वाचन, 10:30 वाजता स्वामी समर्थ महाराजांची आरती,नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उदगीर तालुक्यातील, जळकोट, देवणी परिसरातील तसेच सीमा भागातील भाविक- भक्त, सेवेकरी यांच्या उपस्थितीत परब्रम्ह स्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन बामनपल्ले,माधव सूर्यवंशी,विनायक गादा,विशाखा गादा,पांडुरंग गुडमेवार, निवृत्ती जवळे,सत्यवान बिरादार, राम करेप्पा,बाबासाहेब देशमुख, वनमाला नीला, ममता बिरादार, कल्पना काळे, प्रतीक्षा हिबारे, प्रतिभा अष्टुरे,वृषाली मारमवार ,सारिका देशमुख यांच्यासह अनेक श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.