उदयगिरी अकॅडमी चे माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) येथील
उदयगिरी अकॅडमी मध्ये शिकत असलेल्या इयत्ता 1ली ते 10वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा उदयगिरीचे चे माजी विद्यार्थी डॉ. ऋतुजा हिबारे व ऋषिकेश बागडी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमी चे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके होते.
प्रा. ऋषिकेश बागडी यांनी आपल्या मनोगतात सातत्य, चिकाटी,परिश्रम, आई – वडिलांच्या व गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला यश प्राप्त झाले. तसे असेच यश तुम्हालाही लाभो, अशी इच्छा व्यक्त केली.
डॉ. ऋतुजा हिबारे यांनी आपल्या मनोगतात अभ्यास व शारीरिक क्षमता या दोन्हीचाही विकास करणे गरजेचे आहे, असे व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी अकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
तसेच एम टी एस इ या परीक्षेत तालुक्यामधून प्रथम येणारा कु. मुळे विक्रांत सदाशिव व तालुक्यातून दुसरा येणारा कु. देवणे गौरव दयानंद या दोघांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या राजकुमार पाटील व तुकाराम केंद्रे यांचाही सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. संतोष पाटील, प्रा. सौ. ज्योती खिंडे, प्रा. गोविंद केंद्रे, प्रा. डॉ .धनंजय पाटील, प्रा. हुरदळे , प्रा. श्रीगण रेड्डी, प्रा. रेगुडे मनिषा यांनी विशेष परिश्रम घेतले.