शेतकऱ्याचे कर्ज माफ करा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू – संभाजी ब्रिगेडचा इशारा

0
शेतकऱ्याचे कर्ज माफ करा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू - संभाजी ब्रिगेडचा इशारा

उदगीर (एल.पी.उगीले)
शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, व खाजगी बाजार भाव व खरेदी विक्री संघाचा म्हणजे सरकारचा हमीभाव यातील फरकाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी. पिक विम्याचे पैसे देण्यात यावेत, शेती साहित्याला 100% अनुदान देण्यात यावे. 2024 च्या निवडणुकीत सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन म्हणजे शेतकऱ्याचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करणार असे दिले होते. आता सरकारने पवित्रा बदलला असून आता परिस्थिती नसल्याचे सांगत आहेत. यावर संभाजी ब्रिगेड ने आक्रमक भूमिका घेतली असून शेतकऱ्याच्या व जनसामान्याच्या प्रश्नासाठी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. यापुढे शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या तर सरकार जबाबदार आहे, आणि सरकारला शेतकऱ्याची कर्जमाफी केलीच पाहिजे. त्याशिवाय सरकारला पर्याय नाही असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने यांनी तहसीलदार राम बोरगावकर यांना निवेदन देताना व्यक्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तमरावजी फड,जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री बळवंत चिंचोलकर, उदगीर तालुकाध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव,शिवश्री सहसचिव व्यंकट थोरे,शिवश्री मनोहर हिंडे, शिवश्री नरसिंग बनशेळकीकर,तालुका कार्याध्यक्ष शिवश्री धम्मसागर, सुमनबाई नरसिंग सोमवंशी,शिवश्री सावन सोभाबाई अशोकराव तोरणेकर , शिवश्री दीपक गायकवाड,शिवश्री भागवत संगीता रमेश चौधरी,शिवश्री अतिशकुमार लिमराज अष्टेकर, शिवश्री तुकाराम नामदेव कांबळे ,शिवश्री बंटी भाऊ घोरपडे,शिवश्री. श्याम वाघमारे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!